कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:35 PM2019-12-27T13:35:12+5:302019-12-27T13:54:23+5:30

रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajiraje is said to be out of Raigad Authority Committee | कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

Next

मुंबई: रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु असल्याचा आरोप रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. गडावर एखाद बाधंकाम करायचं असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही का असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.

संभाजी राजे यांनी फेसबुकवर पोस्ट करत काल दुर्गराज रायगडवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गेलो असता, अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या असल्याचे सांगितले. यामध्ये रोपवे च्या लोकांनी नियम धाब्यावर बसवून, परवानगी न घेता बांधकाम चालू केल्याचे दिसून आले. लोकांच्या सोयी सुविधेसाठी आणि संवर्धनाच्या कामासाठी प्राधिकरणाला रोखले जाते. नियमांकडे बोट दाखवून अनेक कामांना स्थगीती देणाऱ्या पुरातत्व खात्याने रायगड विकास प्राधिकरणाच्या माघारी अशी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच अनैतिक कामांवर वचक बसवण्याकरिता त्यांच्यावर गुन्हे दाखल का नाही करण्यात आले? रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असं संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच राजधानी रायगडचे जतन व संवर्धन योग्यप्रकारे व्हावे यासाठी मी व माझं कार्यालय आहोरात्र झटत असतो. गडावर एखाद बाधंकाम करायच असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची अवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही का असा सवाल देखील संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajiraje is said to be out of Raigad Authority Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.