Join us

छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ स्मारके नकोत - पुरंदरे

By admin | Published: April 13, 2015 10:44 PM

रेल्वे कर्मचार्यांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या रेल चाईल्ड शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त शाळेत दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा संकल्प सोडला होता,

कल्याण : रेल्वे कर्मचार्यांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या रेल चाईल्ड शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त शाळेत दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा संकल्प सोडला होता, त्याप्रमाणे सुरु झालेल्या या व्याख्यानमालेचा बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कार्यक्र माला संस्थेचे अध्यक्ष वि. व देहाडराय, सु.वी.खेडकर, डॉ. योगेश जोशी, काका हरदास यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पण कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित नसल्याबद्दल पुरंदरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या व्यक्ती विकासासाठी शाळा, कार्यकर्ते संस्था आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात राज्यकर्त्यांचे त्याना सहकार्य मिळाले पाहिजे असे सागून पुरंदरे यांनी पालकांशी चर्चात्मक संवाद साधला’शिवचिरत्रातील दाखले देत सध्याच्या राज्यकर्ते, राजकारण यांच्याशी तुलना करीत ते म्हणाले, समुद्र व गडिकल्ले यांच्या आश्रयाने छत्रपतीनी आपले स्वराज्य वाढवले, डोंगरी किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेतले, तसेच अनेक सागरी किल्ले बांधून सुरक्षा यंत्रणा मजबूत केली. त्यांच्या दरबारात उच्चनीच, जात पात याना थारा नव्हता, योग्यता पाहून सहकार्यांना जबाबदाऱ्या दिल्या जायच्या, अत्यंत दूरदृष्टी व योजनाबद्ध कार्यपद्धती ठेऊन त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला, सर्व रयतेला आपले मानून त्यांनी शेतकरी,कष्टकरी यांच्यासाठी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे त्यांच्या काळात शेतकर्याना आत्महत्या करायची वेळ आली नाही.राजकीय पक्ष, नेते आज फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्य करीत आहेत. साहित्य क्षेत्रातील आजचे चित्र हे याहून वेगळे नाही. त्यांच्याकडून नवीन माणसांना-तरु णाना नवीन काही मिळेल हे स्वप्न भंग पावले आहे. महाराजांचे पोवाडे गाण्यापेक्षा त्यांच्या गुणकर्तृत्वाचे अनुसरण होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्मारके उभारण्यासाठी व फोटोंना हार घालण्यासाठी नाहीत तर त्यांचे कर्तृत्व, गुणवत्ता, ध्येय्यासक्ती पहाणे अत्यंत म्हत्वाचे आहे. हे गुण आजच्या राज्य राज्यकर्त्यांत दिसत नाहीत.-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे