Join us

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्कृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:30 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आशिया पॅसिफिक विभागातील ‘उत्कृष्ट विमानतळ’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आशिया पॅसिफिक विभागातील ‘उत्कृष्ट विमानतळ’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ४ कोटी प्रवासी विभागात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१५ पासून सलग चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)ने जागतिक पातळीवर विविध विमानतळांचे सर्वेक्षण करून हा पुरस्कार दिला आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांची मते जाणून घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा उत्तम दर्जाच्या असणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये इंडोनेशियात एसीआयच्या होणाºया जागतिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.विमानतळावर प्रवाशांना मिळणारा प्रवेश, चेक इन सुविधा, सुरक्षितता, खाद्यपदार्थ व इतर सुविधा याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले होते. मुंबई विमानतळावर संपूर्ण अद्ययावत व स्वयंचलित चेक इन प्रक्रिया राबविण्यात येते. बोर्डिंग पास व बॅगेजसाठी कॉमन युज सेल्फ सर्व्हिस प्रक्रिया वापरली जाते. टर्मिनल २ वरून जाणाºया देशांतर्गत उड्डाणासाठी पेपरलेस बोर्डिंग पास प्रक्रिया राबविण्यात येत आहे.