मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:56 IST2025-04-19T14:53:52+5:302025-04-19T14:56:00+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: देखभालीच्या कामामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विमान वाहतूक ९ मे २०२५ रोजी सहा तासांसाठी बंद राहणारआहे

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport to remain shut for 6 hours on May 9 | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!

देखभालीच्या कामामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विमान वाहतूक ९ मे २०२५ रोजी सहा तासांसाठी बंद ठेवले जाणार आहे. पावसळ्याआधी हे काम पूर्ण केले जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने याबाबत शनिवारी माहिती दिली. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने म्हटले आहे की,  ०९/२७ आणि १४/३२ या दोन्ही धावपट्ट्यांवर पावसळ्याआधी देखभालीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम ९ मे रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल. सर्व भागधारकांना माहिती देण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच विमानचालकांना सूचना देण्यात आली. ज्यामुळे विमान कंपन्या त्यांचे उड्डाण वेळापत्रक वेळेपूर्वीच समायोजित करू शकतील आणि त्यानुसार नियोजन करू शकतील. विमानतळाच्या हवाई पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल महत्त्वाची आहे. पावसळ्यात सुरक्षित लँडिंग आणि टेक ऑफ होईल, यासाठी तज्ज्ञ धावपट्टीची तपासणी करतील, असेही एमआयएएलकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जागतिक दर्जाचे शहर आहे. देश पर्यदेशातून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येतात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळावर एका मिनिटाला तब्बल ३५ विमाने लँडिंग करतात आणि सुमारे ५२०० प्रवासी विमानतळावर उतरतात.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj International Airport to remain shut for 6 hours on May 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.