विलेपार्ले आणि अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:17 PM2020-02-19T22:17:29+5:302020-02-19T22:17:42+5:30

पश्चिम दुर्तगती महामार्गावर विलेपार्ले पूर्व हनुमान रोड जवळ आणि अंधेरी पूर्व संहार गोदमा जवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दोन्ही भव्य पुतळावर गेली अनेक वर्षे डोक्यावर छत्र नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj Statues at Vile Parle and Andheri is without Chhatra | विलेपार्ले आणि अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना!

विलेपार्ले आणि अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे छत्रविना!

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई-पश्चिम दुर्तगती महामार्गावर विलेपार्ले पूर्व हनुमान रोड जवळ आणि अंधेरी पूर्व संहार गोदमा जवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दोन्ही भव्य पुतळावर गेली अनेक वर्षे डोक्यावर छत्र नाही.त्यामुळे 365 दिवस ऊन,पावसाचा सामना या दोन्ही पुतळ्यांना करावा लागत आहे.लोकमतच्या बातमीची दाखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम दुर्तगती महामार्गावर गेल्या वर्षी शिवसेनेने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात येथील शिवाजी महाराजांच्या  पुतळ्यावर जर तत्कालीन शासनाने छत्र बसवले नाही तर,शिवसेना स्वतः छत्र बसवले जाईल,  असे ठोस आश्वासन परिवहन मंत्री अँड.अनिल परब आणि माजी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रानी दिले होते. याची आठवण वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि अँड.गॉडफ्रे पिमेटा यांनी लोकमतशी बोलतांना दिली.लोकमतने देखिल 2014 पासून सातत्याने हा विषय मांडला आहे.

त्यामुळे याठिकाणी छत्र बसवण्यासाठी येथील स्थानिक आमदार म्हणून आपण जातीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी निकोलस अल्मेडा आणि अँड.गॉडफ्रे पिमेटा यांनी  विलेपार्ले विधानसभेचे भाजपा आमदार अँड.पराग अळवणी यांना केली आहे.

सहार गोदमाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील टी-2 टर्मिनल समोर बसवावा अशी मागणी निकोलस अल्मेडा आणि अँड.गॉडफ्रे पिमेटा आणि सर्व शिवप्रेमींनी त्यांनी राज्य सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीचे मियाल यांच्याकडे केली.

तत्पूर्वी अंधेरी पूर्व  सहार गावच्या शिवप्रेमींसोबत ग्रामस्थांनी, आज सकाळी शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली.यावेळी गावकऱ्यांनी बॅन्ड वाजवत मिरवणूक काढली.येथील  वैलांकणी महिला देखिल मिरवणुकीत  कुटूंबासह सहभागी झाल्या होत्या.

सहार गोदाम पाइपलाइन जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला.यावेळी अँड.पराग अळवणी यांनी  वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक निकोलस अल्मेडा आणि सहार ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Statues at Vile Parle and Andheri is without Chhatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.