"महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा, महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!", 'सामना'तून रोखठोक इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:42 AM2022-11-14T08:42:27+5:302022-11-14T08:43:29+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. 

Chhatrapati Shivarai soul for Maharashtra dont sell this soul of Maharashtra! warning from Samana editorial | "महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा, महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!", 'सामना'तून रोखठोक इशारा!

"महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा, महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!", 'सामना'तून रोखठोक इशारा!

googlenewsNext

मुंबई-

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मराठी चित्रपटांवरुन चुकीच्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी केली जात असल्याच्या आरोपावरुन वादंग सुरू असताना आता याप्रकरणावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चित्रपट निर्मात्यांना रोखठोक इशारा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. 

इतिहासावरुन नवे वादंग या मथळ्याखाली हा अग्रलेख छापण्यात आला आहे. प्रामुख्यानं यात नुकताच प्रदर्शित झालेला 'हर हर महादेव' सिनेमाबाबत निर्माण झालेल्या वादावर भाष्य करण्यात आलं आहे. "महाराष्ट्रात जेम्स लेनचे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी जेम्स लेन या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!", असा इशारा देण्यात आला आहे. 

'सामना'च्या अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे...
>> पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील 'विद्वान' म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील!

>> 'हर हर महादेव' असा एक मराठी चित्रपट पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विकृत प्रदर्शन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत असत्य कथन केले आहे, असे आक्षेप आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी त्यावरुन या चित्रपटास विरोध केला आहे. 

>> राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरतेच राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. 

>> मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड 'गल्लाभरू' चित्रपटांसाठी केली जाऊ नये.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Chhatrapati Shivarai soul for Maharashtra dont sell this soul of Maharashtra! warning from Samana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.