छोटा राजनवर आरोप निश्‍चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 06:17 AM2016-09-01T06:17:33+5:302016-09-01T06:17:33+5:30

ष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी विशेष मकोका न्यायालयाने राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनवर आरोप निश्‍चित केले. त्यामुळे खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chhota Rajan charges fixed | छोटा राजनवर आरोप निश्‍चित

छोटा राजनवर आरोप निश्‍चित

Next

जे. डे हत्या प्रकरण : खटल्याचा मार्ग मोकळा

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी विशेष मकोका न्यायालयाने राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनवर आरोप निश्‍चित केले. त्यामुळे खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डे यांच्या हत्येचा खटला सुरू असताना, इंडोनेशिया पोलिसांच्या हाती छोटा राजन लागला. बाली विमानतळावर छोटा राजनला अटक करण्यात आली. त्यामुळे हा खटला थांबवण्यात आला. छोटा राजनवर महाराष्ट्रात ७0 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. या सर्व केसेस सरकारने सीबीआयकडे वर्ग केल्या आहेत आणि सीबीआयने जे. डे हत्येचा तपास करण्यास सुरुवातही केली. काहीच दिवसांपूर्वी सीबीआयने छोटा राजनवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले.
आर्थर रोड कारागृहात कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात असलेल्या विशेष मकोका न्यायालयात छोटा राजनला व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थित करण्यात आले. राजनवर आरोप निश्‍चित करण्यात आले, तेव्हा न्या. समीर आडकर यांनी त्याला हे आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर छोटा राजनने आपल्याला हे आरोप मान्य नसून, खटल्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे न्यायाधीशांना सांगितले.
हत्येचा कट रचल्याचा, हत्या, हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आणि मकोकातील काही कलमांतर्गत छोटा राजनवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. आरोप निश्‍चित केल्यानंतर न्यायालयाने यावरील सुनावणी ७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. या सुनावणीवेळी सीबीआय पुढे काय करणार आहे, याची माहिती न्यायालयाला देणार आहे. तर बचाव पक्षाचे वकील यापूर्वी साक्ष नोंदवलेल्या साक्षीदारापैकी कोणाला परत बोलावयचे आहे की नाही, याबद्दल न्यायालयाला सांगतील

Web Title: Chhota Rajan charges fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.