हॉटेल व्यावसायिक हत्या; छोटा राजनची मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:21 IST2022-02-13T13:20:32+5:302022-02-13T13:21:31+5:30
हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला आरोपमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी छोटा राजन याच्यावर ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

हॉटेल व्यावसायिक हत्या; छोटा राजनची मुक्तता
मुंबई : दहिसर येथे १९९९ साली व्यावसायिक नारायण पुजारी यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्यानंतर चार गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात पुजारी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी छोटा राजनवर खंडणी व हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, शुक्रवारी विशेष न्यायालयानेछोटा राजन याला या प्रकरणातून क्लीन चिट देत त्याची आरोपमुक्तता केली.
हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला आरोपमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी छोटा राजन याच्यावर ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर छोटा राजन फरार आरोपी म्हणून दाखविण्यात आला. यात पोलिसांना रमाकांत पांडे याला अटक करण्यात यश आले. विशेष न्यायालयाने त्याला आयपीसी, मोक्का आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले.