मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन तर शरद पवारांनी पत्र लिहून राज्यपालांना दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:00 PM2021-06-17T19:00:56+5:302021-06-17T19:01:37+5:30
राज्यपाल यांनी शिक्षक बनून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, पत्रकारितेतही त्यांनी काही वर्षे काम केलं. त्यानंतर, त्यांनी राजकारणाची वाट धरली
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज 80 वाढदिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्गजांकडून राज्यपालांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच मंत्री आणि विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
राज्यपाल यांनी शिक्षक बनून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, पत्रकारितेतही त्यांनी काही वर्षे काम केलं. त्यानंतर, त्यांनी राजकारणाची वाट धरली. राजकारणातही त्यांना मोठं यश मिळाल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनून त्यांनी राज्य कारभार हाताळला आहे. आता, सध्या ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त आहेत. मराठी भाषेत शपथ घेणारे राज्यपाल म्हणून त्यांनी मराठीजनांनी वाह वा मिळवली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/6ffWBCbd89
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 17, 2021
राज्यापाल कोश्यारी यांचा आज वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं असून उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Warm Birthday wishes to Hon’ble Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari ji. I extend my best wishes to you for your long, healthy, happy and peaceful life.@BSKoshyari@maha_governor#BirthdayWishespic.twitter.com/YHJrhLzPl9
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 17, 2021
संजय राऊतांकडून शुभेच्छा अन् भेट देण्याची अपेक्षा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलंय.
12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर
ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर 15 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.