उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:19 AM2019-09-06T06:19:54+5:302019-09-06T06:20:40+5:30

रावते यांच्य कामावर उद्धव खूश; विद्युत बसचे लोकार्पण, ४९ मजली इमारत, निवासस्थानांचे भूमिपूजन

Chief Minister condemns Thackeray's program in mumbai best | उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी

उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण, मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या ४९ मजली इमारतीचे आणि कुर्ला, विद्याविहार येथे एसटी कामगारांसाठी निवासस्थानांच्या जमिनीचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत देओल यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई सेंट्रल येथील आगारात करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांच्याकडे पाहत खातेवाटपाबाबत सूचक विधान केले. मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या विकासासाठी भरभरून मदत केली, असेही ते या वेळी म्हणाले. एसटीचा प्रत्येक कामगार कुटुंबातील सदस्यासारखा आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता कामगार कर्तव्य पार पाडत असतो, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रवाशांच्या सोयीसाठी देशातील पहिली विद्युत बस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. याचे श्रेय रावते यांचे आहे. रावते हे धावते आहेत. त्यामुळेच एसटीच्या प्रगतीची चाके सतत धावत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी रावते यांच्या कामाचेही यावेळी कौतुक केले.
तर, यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी सांगितले की, मुंबईत राहण्यासाठी जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सुटावा, त्यांना चांगला निवारा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्या निवासासाठी कुर्ला, विद्याविहार येथे निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.

प्रवाशांना ‘शिवशाही’, ‘विठाई’ आवडली. त्याचप्रमाणे आता नव्याने दाखल झालेली ‘शिवाई’देखील आवडेल. तिच्या रूपात पहिली विद्युत बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. विदर्भात विमानतळासारखी बस स्थानके तयार करण्यात आली आहेत. नाशिक येथे असे बस स्थानक बनविण्याचे काम सुरू आहे. कामगारांसाठी कायमस्वरूपी नोकरी एसटी महामंडळाकडून दिली जात आहे. यासह ५ ते १२ हजारांची पगारवाढही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा निरोप दाखवला वाचून
भूमिपूजन आणि विद्युत बसच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली. ‘सॉरी ३.३० वाजता कार्यक्रमाला येणे शक्य होणार नाही. राज्यपालांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे. उद्धव ठाकरे यांना सांगा,’ असा मुख्यमंत्र्यांचा निरोप रावते यांनी वाचून दाखविला.

कर्मचाºयांसाठी १२ मजली दोन इमारती
कुर्ला, विद्याविहार येथील एकूण दहा एकर भूखंडावर सार्वजनिक खासगी भागीदारीतून कर्मचाºयांसाठी १२ मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. येथे वन बीएचके अशी ११८ निवासस्थाने असतील. या विकासकामात व्यावसायिक तत्त्वावर शाळा सुरू करण्यात येतील. यामध्ये ५० जागा एसटी कर्मचाºयांच्या मुलांसाठी राखीव असतील.

४९ मजली इमारत येथील मुंबई सेंट्रलच्या आगाराच्या जागेवर उभी करण्यात येणार आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर उपाहारगृह प्रस्तावित आहे. इमारतीमधील १ ते ८ मजले वाहनतळासाठी उपलब्ध असतील. ९ ते १४ व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचे सध्याचे मध्यवर्ती कार्यालय स्थलांतरित करण्यात येईल. १५ ते ४९ मजले शासनाच्या विविध विभागांना भाड्याने देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे भाड्याच्या स्वरूपामध्ये महामंडळाला कायमचा महसूल मिळत राहील. शासनाची मुंबई शहरातील अनेक कार्यालये या एकाच इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच छताखाली शासनाच्या अनेक कार्यालयांमध्ये जा-ये करणे सुलभ होणार आहे.
च्मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाची १ हेक्टर ८ आर जागा आहे.
च्४९ मजली इमारत बांधण्यासाठी ४६८.१२ कोटी इतका खर्च अपेक्षित.
च्१ लाख २३ हजार चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्र उपलब्ध होईल.
च्भाड्याच्या स्वरूपामध्ये प्रति महिना महामंडळास १६.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
 

Web Title: Chief Minister condemns Thackeray's program in mumbai best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.