मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीत शिक्कामोर्तब; संजय बर्वेसह अनेक अधिकारी नाराज, निरोप समारंभाला गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:24 AM2018-07-01T04:24:07+5:302018-07-01T04:24:35+5:30

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा कोणाकडे सोपविली जाते, याकडे पोलिसांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागून राहिले असताना सुबोध जैस्वाल यांची अनपेक्षितपणे निवड करीत राज्य सरकारने सर्वांना धक्का दिला आहे.

Chief Minister of Delhi; Many officials, including Sanjay Barve, are unhappy at the ceremony | मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीत शिक्कामोर्तब; संजय बर्वेसह अनेक अधिकारी नाराज, निरोप समारंभाला गैरहजर

मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीत शिक्कामोर्तब; संजय बर्वेसह अनेक अधिकारी नाराज, निरोप समारंभाला गैरहजर

Next

- जमीर काझी

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा कोणाकडे सोपविली जाते, याकडे पोलिसांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागून राहिले असताना सुबोध जैस्वाल यांची अनपेक्षितपणे निवड करीत राज्य सरकारने सर्वांना धक्का दिला आहे. आयुक्तपदासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख संजय बर्वे यांचे नाव शेवटपर्यत आघाडीवर असताना अखेरच्या क्षणी जैस्वाल यांची वर्णी लागण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर जैस्वाल यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीहून परतल्यानंतर जैस्वाल यांनी सायंकाळी सूत्रे स्वीकारली.
डावलले गेल्याने निराश झालेले बर्वे यांनी मावळत्या पोलीस महासंचालक माथूर यांचा निरोप समारंभ, पडसलगीकर यांचे स्वागत तसेच वरळीतील ‘डिनर’ला गैरहजर राहून नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासह ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, ‘एफएसएल’चे महासंचालक एस. पी. यादव, होमगार्डचे डीजी संजय पांण्डेय, ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग, नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे हे माथूर यांच्या निरोप समारंभाला अनुपस्थित होते. बर्वे न आल्याने ऐनवेळी पोलीस गृहनिर्माण विभागाचे प्रमुख बिपीनबिहारी यांना भाषण करण्यास सांगण्यात आले.

ठाणे, नवी मुंबईच्या नियुक्त्या रखडल्या
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे, पुणे, नवी मुंबई, एटीएस आयुक्तपदाच्या बदल्या तसेच राज्य गुप्तवार्ता (एसआयडी), एसीबीची रिक्त पदे मुंबई आयुक्त व नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबरोबरच भरली जातील; त्याचप्रमाणे राज्यभरातील पोलीस अधीक्षक, उपायुक्ताच्या बढत्या, बदल्यांचे आदेश जारी केले जातील, अशी चर्चा होती. मात्र राज्य सरकारने केवळ दोनच पदांची नियुक्ती शनिवारी गेली. त्यामुळे वरील पदांवर नियुक्तीसाठी इच्छुक असलेले वरिष्ठ अधिकारी नाराज झाले. ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने किमान आयुक्तालयातील फेरबदल येत्या दोन दिवसांत करणे आवश्यक आहे. अन्यथा सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.

1985
च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले जैस्वाल हे १० वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. ते सुरुवातील महाराष्टÑात पुन्हा परतण्यासाठी अनुत्सुक होते. त्याऐवजी पुढच्या वर्षी जुलैमध्ये ‘रॉ’चे महासंचालकपद रिक्त होत असल्याने त्यासाठी ते इच्छुक असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे जैस्वाल यांनी दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने विचारणा करूनही महाराष्टÑात येण्याची तयारी दर्शविली नव्हती.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीत त्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर गृह विभागाकडून तातडीने हालचाली करून त्यांना स्वत:च्या ‘महाराष्टÑ केडर’मध्ये परत पाठविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. दुपारी ३च्या सुमारास ते पोलीस मुख्यालयात हजर झाले. सतीश माथुर यांची भेट घेत ‘रिपोर्टिंग’ केले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गृह विभागातून मुंबई आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश निघाल्यानंतर ते मुख्यालयातून क्रॉफर्ड मार्केटकडील मुंबई आयुक्तालयाकडे निघाले.

प्रभाकर बुधवंत यांना निवृत्तीपूर्वी दोन तास बढती
उपमहानिरीक्षक, अपर आयुक्तपदाची ११ पदे रिक्त असून त्यासाठी अधिकाऱ्यांची निश्चिती सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. त्यापैकी एक असलेले पुणे लोहमार्गाचे अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत हे ३० जूनला रिटायर झाले. त्यामुळे प्रमोशनच्या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर असतानाही त्यांची विशेष बाब म्हणून दुपारी साडेतीनच्या सुमारास गृह विभागाकडून पुणे शहर उत्तर विभागाचे अपर आयुक्त म्हणून बढतीचे आदेश काढण्यात आले. पुण्याला तातडीने फॅक्स पाठविल्यानंतर जेमतेम अडीच तासांनंतर ते अपर आयुक्त म्हणून निवृत्त झाले. गृह विभागाच्या या उदासीनतेमुळे अन्य अधिकाºयांतून
तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही तासांच्या पदोन्नतीमुळे बुधवंत यांना निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन व भत्ते मिळण्यावर समाधान मानावे लागेल.

Web Title: Chief Minister of Delhi; Many officials, including Sanjay Barve, are unhappy at the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.