Join us

मेट्रो-३ मार्गिकेच्या मेट्रो डब्ब्यांच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्रांच्या हस्ते अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 3:22 PM

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत.

मुंबई  - मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो-३ मेट्रोचे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला दिलेले आहे. मेट्रो-३ या संपूर्णतः भूमिगत मेट्रो मार्गिकेला अ‍ॅक्वा लाईन असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना हा नावाला सुयोग्य अशी करण्यात येणार आहे.

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मेक ईन इंडिया या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्याची निर्मिती अँलस्टाँम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-३ चे डब्बे अद्ययावत असतील तसेच विना चालक कार्यन्वयनासाठी सक्षम असणार आहेत, असे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले. 

मेट्रो-३ डब्यांच्या संकल्पनेविषयीकधीही न झोपणारे आणि गतिमान शहर म्हणून प्रचलित असणाऱ्या मुंबईची प्रेरणा घेऊन मेट्रो-३ चे डब्बे डिजाईन करण्यात आले आहेत. मुंबईचा समुद्र आणि वाहत्या पाण्याचा ताजेपणा आणि गती या पासून प्रेरणा घेऊन या डब्यांची रंगसंगती ठरविण्यात आले आहे. यामध्ये फिका हिरवा (अ‍ॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगाचा वापर करण्यात आला असून त्यापैकी हिरवा रंग समुद्राच्या लाटांचा प्रवाहिपणा, ताजेपणा आणि गती तसेच पिवळा रंग हा आरामदायी प्रवासाचे प्रतीक आहे, असे एमएमआरसीमार्फत स्पष्ट करण्यात आले. 

मेट्रो-३द्वारे प्रवाशांना आरामदायी सुखकर, वेगवान आणि शाश्वत सेवा मिळणार आहे. कार्यान्वित झाल्यावर मेट्रो-३मुंबईची नवीन जीवनवहिनी ठरणार आहे

 असे असतील मेट्रो-३ मार्गिकेवरील डब्बे

१)सुरक्षित आरामदायी प्रवास संपूर्णतः वातानुकूलित व आर्द्रता नियंत्रण यंत्रणा२)प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिराती करिता एलसीडी चा वापर३) मार्गिकेचे डिजिटल नकाशा४)प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर५)अतिशय सुंदर बैठक व्यवस्थेसह उभे राहण्यासाठी खांबांची व्यवस्था६) दिव्यांग प्रवाशाच्या सोईसाठी व्हील चेयर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था७) सुखकर प्रवासाच्या अनुभूती करिता अद्ययावत एयर सस्पेन्शन चा वापर८) प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्हीची सुविधा९) आगीपासून संरक्षणासाठी प्रत्येक डब्ब्यात अग्नीशमन, धूर व अग्नी शोधक यंत्रणा7) आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद राहण्यासाठी ध्वनी संवाद (व्हॉईस कम्युनिकेशन) यंत्रणा

याविषयी प्रतिक्रिया देताना एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे म्हणाल्या " मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मेट्रो-३च्या डब्ब्याच्या प्रतिकृतीचे अनावरण होणे हा आमच्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे. मेट्रो-३च्या डब्ब्याच्या निर्मितीस नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात होणार असून पहिली गाडी एका वर्षाच्या आत मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे". 

टॅग्स :मेट्रोदेवेंद्र फडणवीस