‘केईएम’ने शताब्दी वर्षात येत्या १०० वर्षांचे नियोजन करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:16 IST2025-01-19T07:16:01+5:302025-01-19T07:16:13+5:30

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व केइएम रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन रुग्णालयात करण्यात आले होते.

Chief Minister Devendra Fadnavis expressed his expectation that ‘KEM’ should plan for the next 100 years in the centenary year. | ‘केईएम’ने शताब्दी वर्षात येत्या १०० वर्षांचे नियोजन करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा 

‘केईएम’ने शताब्दी वर्षात येत्या १०० वर्षांचे नियोजन करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा 

मुंबई : केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून, हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली. 

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व केइएम रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन रुग्णालयात करण्यात आले होते. त्यावेळी  व्यासपीठावर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खा. मिलिंद देवरा, आ. अजय चौधरी, कालिदास कोळंबकर, राजहंस सिंह, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अधिष्ठाता संगीता रावत, आदी उपस्थित होते.

केईएम रुग्णालयाने आपल्या शताब्दी वर्षात पुढील १०० वर्षांचे नियोजन करण्याबरोबरच गेल्या १०० वर्षांचे सिंहावलोकन करणे गरजेचे आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेसाठी समर्पणवृत्तीने काम करणाऱ्यांना धन्यवाद दिले. आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. 

अरुणा शानभाग यांचे स्मरण 
कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी कौतुकास्पद काम केले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. केईएम हे कुटुंब आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. हे परिचारिका अरुणा शानभाग प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. ४१ वर्षे कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानभाग यांची रुग्णालयांतील त्यांच्या  सहकाऱ्यांनी शुश्रूषा केली, असा दाखला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. 
इमारतीचे ई-भूमिपूजन 
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसठी २१ मजली इमारतीचे ई-भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अधिष्ठाता संगीता रावत यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर्स, प्राध्यापक तसेच आजी आणि माजी  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis expressed his expectation that ‘KEM’ should plan for the next 100 years in the centenary year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.