Join us  

मुंबईकरांसाठी आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By सीमा महांगडे | Published: January 14, 2024 11:49 PM

Mumbai: सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच आता मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगरात ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या उपक्रमात पालिकेचा आरोग्य विभाग प्रत्येक घरा- घरात भेट देऊन ही मोहीम राबविणार आहे.

- सीमा महांगडे मुंबई - सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच आता मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगरात ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या उपक्रमात पालिकेचा आरोग्य विभाग प्रत्येक घरा- घरात भेट देऊन ही मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती मुखयमंत्र्यांनी दिली.

महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छ‍ता मोहीम अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये होत असलेल्या स्वच्छता कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांच्या दौ-यात ठिकठिकाणी भेट देवून पाहणी केली. या निमित्ताने विविध ठिकाणी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुंबईत २५०  आपला दवाखाने सुरू करणारदिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्ष, चिकित्सा कक्ष, औषध निर्माता कक्ष, नर्सिंग रूम या  ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. या आपला दवाखान्याचा लाभ आनंद वाडी, लक्ष्मण नगर, सिद्धार्थ नगर आदी परिसर मिळून सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांना होणार आहे. या आपल्या दवाखान्याला म. वा. देसाई महानगरपालिका रुग्णालयाची संदर्भित सेवा मिळणार आहे.  सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत २५० हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत २०२ दवाखाने सुरू झाले आहेत. ५ एकर जागेवर उद्यानाचा विकासबुवा साळवी मैदानाला लागूनच असलेल्या शारदाबाई गोविंद पवार उद्यानाचा विकास करुन पार्क व उद्यान तसेच अनुषांगिक सेवा निर्मित करण्यात येत आहे. या सुशोभीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ५ एकर क्षेत्रफळाच्या या जागेवर जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा/विपश्यना/सांस्कृतिक सभागृह, मुलांना खेळण्यासाठी कृत्रिम हिरवळ असलेली जागा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा, व्ह्यूइंग गॅलरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा, कबड्डी-कुस्ती क्रीडा क्षेत्र व खुली व्यायामशाळा, सुशोभीत फुलांची रोपं व हिरवळ, एलईडी दिवे,  सुरक्षारक्षक दालन, प्रसाधनगृह अशा वैविध्यपूर्ण सेवा या उद्यानामध्ये आता पुरवल्या जाणार आहेत. पावसाचे पाणी पुनर्भरणाची सोय देखील उद्यानाच्या कामांमध्ये समाविष्ट आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई