मुंबई : ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी माझे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलात, खरी गद्दारी तुम्हीच केलीत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव इथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.जगातील अनेक देशांनी आपल्या उठावाची दखल घेतली आहे. मागील वर्षी ३० जूनला शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्यापासून स्वाभिमान, क्रांती दिन, उठाव दिन साजरा करूया आणि गद्दारांना चोख उत्तर देऊया. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण अधिकृत दिले. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
वाघ डरकाळी फोडत नाही तोवरच काेल्हेकुईसगळे खोके कुठे गेलेत हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, मी आज त्याच्यावर मोकळेपणाने बोलू इच्छित नाही; पण सगळे बाहेर येईल. काहीजण म्हणतात कातडे पांघरून कोल्हे निघाले, अरे तुमची कोल्हेकुई सुरू कधीपर्यंत असते जेव्हा वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत, वाघ जंगलात आल्यानंतर सगळे शेपूट घालून पळतात, असेही शिंदे म्हणाले.
मी गाडीतून फायली नेतो, रस्त्यात सही करतो तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवीत होता. मी गाडीतून जातो तेव्हा सह्या करायला फायली घेऊन जातो, रस्त्यात सही करतो. अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते, माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
आपल्या मर्यादेत राहाकालच्या भाषणात मोदी शाहंना किती शिव्या दिल्या, ते कुठे तुम्ही कुठे, साऱ्या राज्याने पाहिले आहे; पण जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा गेले मोदींना भेटायला. शिष्टमंडळ ठेवले बाहेर आणि शिष्टाई गेली आत, आम्हाला सगळे माहीत आहे. मर्यादेत आणि कुवतीत राहा. - एकनाथ शिंदे