मुंबई- काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर टीका केली. पन्नास खोकेवरुन पुन्हा शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी टीका केली, यावरुन काल मंत्री दिपक केसरकर यांनी फ्रीजमधून खोके कुठे गेले, असा सवाल करत सूचक इशारा केसरकर यांनी दिला होता. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इशारा दिला आहे.
'काल दिपक केसरकर यांनी केलेले वक्तव्य बोध घेण्यासारखे आहे. प्रिजमधून गेलेले खोके कुठे गेले याचा मी शोध घेतो आणि मी तुमच्याशी बोलतो, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. कंटेनरमधून फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुठे गेले, याचा शोध आता आम्ही घेणार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“एक दिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील,” मनसे नेते वसंत मोरेंनी व्यक्त केली नाराजी
उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ
काल बुलढाण्यात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ' मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? जो शेतकरी राबतोय तो आज विचारतोय मी खायचं काय? शिव्या खावून तुमचं पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.