एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, सामान्य प्रशासन देवेंद्र फडणवीसांकडे गृह अन् वित्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:14 AM2022-08-10T06:14:16+5:302022-08-10T06:14:25+5:30

मंगळवारी खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झाले नाही.

Chief Minister Eknath Shinde will have important portfolios of urban development and general administration | एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, सामान्य प्रशासन देवेंद्र फडणवीसांकडे गृह अन् वित्त!

एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, सामान्य प्रशासन देवेंद्र फडणवीसांकडे गृह अन् वित्त!

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती असतील तर गृह व वित्त खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झाले नाही.

मंत्र्यांची खाती

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील -सार्वजनिक बांधकाम, सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा व वने, गिरीश महाजन - जलसंपदा, अतुल सावे- आरोग्य, डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास, सुरेश खाडे - सामाजिक न्याय, रवींद्र चव्हाण - गृहनिर्माण, दीपक केसरकर - पर्यटन व पर्यावरण, तानाजी सावंत - उच्च व तंत्रशिक्षण, अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व कौशल्य विकास, शंभूराज देसाई - उत्पादन शुल्क, गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा, संजय राठोड - ग्रामविकास, उदय सामंत - उद्योग,  असे खातेवाटप होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde will have important portfolios of urban development and general administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.