मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती असतील तर गृह व वित्त खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झाले नाही.
मंत्र्यांची खाती
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील -सार्वजनिक बांधकाम, सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा व वने, गिरीश महाजन - जलसंपदा, अतुल सावे- आरोग्य, डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास, सुरेश खाडे - सामाजिक न्याय, रवींद्र चव्हाण - गृहनिर्माण, दीपक केसरकर - पर्यटन व पर्यावरण, तानाजी सावंत - उच्च व तंत्रशिक्षण, अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व कौशल्य विकास, शंभूराज देसाई - उत्पादन शुल्क, गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा, संजय राठोड - ग्रामविकास, उदय सामंत - उद्योग, असे खातेवाटप होणार असल्याची चर्चा आहे.