Join us

ठाकरे - आंबेडकर युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 4:23 PM

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचे जाहीर केले.

मुंबई- आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचे जाहीर केले. 'प्रबोधनकारांचे जे हिंदुत्व होते त्यावर चालण्याचे धोरण घेतल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत टीका केली आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी एका वाक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या युतीवर जास्त काही बोलणे मुख्यमंत्री शिंदेंनी टाळले आहे. 

दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय, तिला...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंचा घणाघात

अडीच-तीन वर्षापूर्वी आम्हाला गृहित धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही. शरद पवारांचा लौकीक तुम्हाला माहित्येय. कधीपण दगा देतील असं मला काहींनी सांगितले. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. आता एकूण राजकारण जे सुरू आहे ते दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय ती गाडून टाकण्याची गरज आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, गरिबांचा जो भ्रमनिराश झालेला आहे तो दूर करण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीला उशीर होत नाही. सुरुवात करण्याची जी गरज असते ती वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीने झालीय. गेल्या लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचं प्रकाश आंबेडकरांनी नुकसान केले असेल पण आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. भाजपासोबत आमची युती होती. त्यांनी स्वार्थापायी ही युती तोडली. भाजपानं दगाफटका केला. आत्ताचं भाजपा नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्या पक्षातीलच नेतृत्वाची एक फळी कापून टाकली आहे. राजकारण विरोधक, शत्रू नको असं समजू शकतो पण भाजपाला मित्रही नकोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे