ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत तिसरा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला. वांद्रे प्रोमोनेड येथे आयोजित योगशिबिरामध्ये मुख्यमंत्र्यांनी योगासने केली.
मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांमध्ये योग दिन साजरा करावा, असे पत्रक शाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानुसार, शाळांमध्ये योग दिनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी पावणेसातला शिक्षणमंत्री विनोद तावडे धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १० हजार विद्यार्थी ३०० महाविद्यालयांत योग दिन साजरा करणार आहेत. तसेच विद्यापीठाने तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते. दिव्यराज फाउंडेशनतर्फेही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर योगा करणार आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उमरखाडी येथील मुलींचे निरीक्षण गृहामधील महिला व मुलींसोबत सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत.
Maharashtra CM Devendra Fadnavis and Railway Minister Suresh Prabhu performed Yoga in Mumbai #InternationalYogaDaypic.twitter.com/IiXNF5v6mu— ANI (@ANI_news) June 21, 2017