Join us

राज्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

By मनोहर कुंभेजकर | Published: December 15, 2023 5:21 PM

मुंबई-राज्यातील शिक्षकांच्या  प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी रात्र शाळेच्या दुबार शिक्षकांचे पगार तांत्रिक अडचण दूर ...

मुंबई-राज्यातील शिक्षकांच्या  प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी रात्र शाळेच्या दुबार शिक्षकांचे पगार तांत्रिक अडचण दूर करून त्वरित करावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अंशतः अनुदानाचा पुढचा टप्पा व २००५ नंतरच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत पुढील तीन महिन्यात ठोस निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा कायंदे व शिवसेना शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांना दिले. ज्या शिक्षकांचे पगाराचे खाते युनियन बँकेत आहे त्यांचे पगार युनियन बँकेतच होईल, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

२००५ नंतरच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अंशता अनुदानित शाळा व शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा त्वरित अदा करावा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ मध्ये याची आर्थिक तरतूद करावी, मुंबईतील रात्र शाळेच्या दुबार शिक्षकांचे पगार सर्व तांत्रिक अडचणी सोडून त्वरित सुरू करावेत, मुंबईतील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार त्यांची इच्छा असलेल्या राष्ट्रीयकृत युनियन बँकेतच व्हावेत असे पत्र तात्काळ शिक्षण उपसंचालकांनी काढावे व शिक्षकांमधील संभ्रम दूर करावा अश्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचे शिवाजी शेंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :शिक्षकएकनाथ शिंदे