मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीं यांचे गुंतवणुकीसाठी मुंबईतील उद्योजकांकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:06 AM2023-02-23T06:06:34+5:302023-02-23T06:07:03+5:30

मुंबईत ट्रायडंट हॉटेल येथे राज्यातील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Chief Minister Jaganmohan Reddy encouraged Mumbai entrepreneurs to invest | मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीं यांचे गुंतवणुकीसाठी मुंबईतील उद्योजकांकडे साकडे

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीं यांचे गुंतवणुकीसाठी मुंबईतील उद्योजकांकडे साकडे

googlenewsNext

मुंबई - उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात सरकारकडून आपापल्या राज्यात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योजकांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता शेजारील राज्य असलेल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही येथील उद्योजकांना आपल्या राज्यात येऊन गुंतवणूक करण्याची ऑफरच दिली आहे. यासाठी एका समिटचे आयोजन नुकतेच मुंबईत करण्यात आले होते. 

मुंबईत ट्रायडंट हॉटेल येथे राज्यातील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे वित्त व नियोजनमंत्री बुगान्ना राजेंद्रनाथ, शहर विकासमंत्री अदिमुलापू सुरेश, उद्योगमंत्री गुडीवाडा अमरनाथ यांनी उद्योजकांना इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत राज्यात गुंतवणूक करणे किती सोपे आहे, हे पटवून सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी पोषक असलेल्या वातावरणाबाबत येथील सरकारच्या धोरणांचेही कौतुक केले. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही महाराष्ट्रात येऊन येथील उद्योजकांना आपल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. 

गुंतवणुकीत आंध्र देशात अव्वल
देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४५ टक्के गुंतवणूक ही आंध्र प्रदेश आणि ओडिशात झाली आहे. देशात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या राज्यात आंध्र प्रदेश अव्वल या स्थानी आहे. आंध्र प्रदेशमध्ये ४० हजार ३६१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ओडिशामध्ये ३६ हजार ८२८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २० हजार ९४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: Chief Minister Jaganmohan Reddy encouraged Mumbai entrepreneurs to invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.