खर्डी : ठाणो जिल्ह्यात ठाणो, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड व शहापूर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यातील शहापूर तालुक्याचे विभाजन करून खर्डी हा नवीन तालुका निर्माण करावा, यासाठी आता खर्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा ठाणो जिल्हा विभाजनाचा प्रश्न अखेर राज्य शासनाने पालघर जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करून सोडवला असून 1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल, असे सांगण्यात येत आह़े
शहापूर तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 1,54,27क् चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या 3 लाखांहून अधिक आहे. तालुक्यातील एकूण गावपाडे 223 असून 11क् ग्रामपंचायती आहेत. 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समितीचे गण आहेत.
तर 5 महसूल मंडळे, 3 पोलीस ठाणी, मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा करणारी तीन धरणो याच तालुक्यात आहेत. भौगोलिकदृष्टय़ा तालुक्याचा आवाका फारच अवाढव्य असून तालुक्यातील रेल्वेला व राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला भाग विकसित असून उर्वरित भाग आजही मागासलेला आहे.
तालुक्यामध्ये शहापूर, वासिंद, कसारा या तीन ग्रामपंचायतींची लोकसंख्या पाहता भविष्यात ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये होणो गरजेचे आह़े तर खर्डी व मोखावणो या दोन जिल्हा परिषदेच्या दोन गटांमधील लोकसंख्या जवळपास लाखभर असून तालुक्यातील हा भाग अतिदुर्गम म्हणून परिचित आहे. तालुक्याचा हा शेवटचा विभाग असून तालुक्याची सीमा मोखाडा तालुका व नाशिक जिल्ह्याला मिळते. (वार्ताहर)
च्येथील गाव, पाडय़ांमध्ये आदिवासी लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना शहापूर येथे कामाकरिता येताना खर्चीक व गैरसोयीचे पडते म्हणून शासनाने तालुक्याचे विभाजन करताना मध्यवर्ती ठिकाण म्हणून खर्डी तालुक्याची निर्मिती करावी, कारण खर्डी हे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोपे व सोयीचे ठिकाण आहे.
च्राष्ट्रीय महामार्ग 3 व मध्य रेल्वेने जोडलेला तसेच सरकारी कार्यालयांसाठी 26 हेक्टर मोकळी सरकारी जागा, कनिष्ठ महाविद्यालय, तांत्रिक विद्यालय, नेव्ही प्रशिक्षण महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, 2 राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक आदी नागरी सोयी येथे उपलब्ध असल्याने खर्डी तालुका करण्याची मागणी आहे.