गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी मध्यरात्री अमेरिकेला होणार रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 10:30 PM2018-03-06T22:30:27+5:302018-03-06T22:30:27+5:30
लीलावती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज मध्यरात्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुढच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत, अशी माहिती त्यांचे स्वीय्य सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे.
मुंबई- लीलावती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज मध्यरात्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुढच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत, अशी माहिती त्यांचे स्वीय्य सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे.
उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याची कल्पना पर्रीकरांनी सर्व मंत्री, आमदार व पक्षाच्या कोअर टीमला सोमवारी दिली आहे. त्यांनी पदाचा कार्यभार कोणाकडेही दिलेला नाही. पण सुदिन ढवळीकर, फ्रान्सिस डिसोझा व विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती नेमून पाच कोटी रुपयांपर्यंतच्या सरकारी कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार त्यांनी दिला.
पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी दोनापावल येथील निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मंत्री, भाजपाचे आमदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. उपसभापती मायकल लोबो हेही पर्रीकर यांच्यासोबत 20 मिनिटे होते.