युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर!, जागावाटपाचा ठरला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:21 AM2019-02-15T06:21:15+5:302019-02-15T06:22:04+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

Chief Minister 'Matoshree' for discussion, formula for the seat sharing | युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर!, जागावाटपाचा ठरला फॉर्म्युला

युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर!, जागावाटपाचा ठरला फॉर्म्युला

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री गुरुवारी वाशिमचा दौरा रद्द करुन मुंबईला परतले. ते रात्री मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा झाली.
आज मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर
जात युतीबाबतची घोषणा
लवकरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
सूत्रांनी सांगितले की, जवळपास महिन्यापासून दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करीत असताना ज्या मुद्यांवर युतीचे घोडे अडलेले होते त्यावर आज मुख्यमंत्री व उद्धव यांच्यात चर्चा झाली. त्यात पालघरची जागा आणि लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करणे आदी मुद्यांचा समावेश होता.
युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि ही चर्चा यापुढेही अशीच सुरू राहील. लवकरच युतीबाबतच्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली जाईल. शेतकरी सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न आणि इतर सार्वजनिक विषय शिवसेनेकडून आजच्या बैठकीत मांडले गेले. भाजपादेखील त्याविषयी गंभीर असून काही निर्णय घेतले जातील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: Chief Minister 'Matoshree' for discussion, formula for the seat sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.