सीमाभागातील अन्यायाबाबत पंतप्रधानांना भेटणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:02 AM2019-07-16T05:02:22+5:302019-07-16T05:02:36+5:30

कर्नाटकमध्ये मराठी माणसांवर जो अन्याय होत आहे तो लोकशाहीला शोभण्यासारखा नाही

Chief Minister to meet Prime Minister on the issue of border dispute | सीमाभागातील अन्यायाबाबत पंतप्रधानांना भेटणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सीमाभागातील अन्यायाबाबत पंतप्रधानांना भेटणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next

मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी माणसांवर जो अन्याय होत आहे तो लोकशाहीला शोभण्यासारखा नाही. तेथील सरकारतर्फे असे अभिप्रेत नाही. सीमा भागातील विविध प्रश्नासंदर्भात, अन्यायासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केंद्र
सरकारकडे प्रश्न मांडू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विविध प्रश्नासंदर्भात सीमावासीयांच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, किरण ठाकूर, जगदीश कुटे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात मराठी माणसांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू असून त्यात
महाराष्ट्र शासन १०० टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा भाग महाराष्ट्राचाच आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सीमावर्ती विभाग हा महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि येथील मराठी शाळा जीवंत ठेवण्यासाठी हा लढा आहे. संविधानाच्या मर्यादेत राहून आपण हा लढा सुरू ठेवू. मराठी भाषा जीवंत राहावी व तिचे संवर्धन व्हावे यासाठी फ्री टू एअर सेवेच्या माधमातून कार्यक्रमाचे प्रसारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
>शासनातर्फे दोन मंत्र्यांची नियुक्ती
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील लोकांवर होत असलेला अन्याय, तेथील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनातर्फे दोन मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल. जेणेकरून तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल.
सीमावर्ती भागातील बेळगाव, कारवार, निपाणी येथील बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शासनातर्फे निधी दिला जाईल.

Web Title: Chief Minister to meet Prime Minister on the issue of border dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.