मराठी शाळांच्या बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री सकारात्मक, आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 07:38 PM2017-09-07T19:38:24+5:302017-09-07T19:38:33+5:30

आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठी शाळांच्या संदर्भात सरकारने रद्द केलेला बृहत आराखडा रद्द केल्याबद्दल आणि राज्याच्या ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील शाळांसाठी योग्य ते धोरण स्वीकारण्याबाबत चर्चा केली.

Chief Minister positive for the implementation of the large format of Marathi schools. Dr. Follow-up of Neelam Gorhe | मराठी शाळांच्या बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री सकारात्मक, आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा

मराठी शाळांच्या बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री सकारात्मक, आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा

Next

मुंबई, दि. 7 - मराठी विकास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी वारंवार केलेल्या मागणी व पाठपुराव्याच्या अनुषंगाने  आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठी शाळांच्या संदर्भात सरकारने रद्द केलेला बृहत आराखडा रद्द केल्याबद्दल आणि राज्याच्या ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील शाळांसाठी योग्य ते धोरण स्वीकारण्याबाबत चर्चा केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली. यावेळी मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.  
 ग्रामीण भागातील नर्सेसच्या कामांचे तास व वाढीव भत्ते याबाबत बैठकीची मागणीला मुख्यमंत्र्यांचा होकार 
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील नर्सेसच्या अतिरिक्त कामांचा वाढता व्याप लक्षात घेता त्यांना प्रोत्साहन भत्ता किंवा विशेष वेतनवाढ मिळावी, त्यांच्या कामांच्या तासांमध्ये पुनर्रचना व्हावी, आरोग्य विभागातील मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स व नर्सेस यांच्या कामांचा तुलनात्मक आढावा घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत या मागण्यासाठी एक बैठक राज्याच्या अर्थमंत्री व आरोग्य मंत्र्यांसोबत घेण्याची विनंती केली. त्यास मा. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पुणे महानगरपालिकेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्याबाबत कार्यवाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.  
पुणे महापालिकेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्याच्या महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्यात येईल. लवकरात लवकर हे तैलचित्र बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आज मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सरकार लवकरच जनतेला हितकारक आणि सुयोग्य निर्णय घेणार असल्याची माहिती आज त्यांनी दिली. शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या  आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते संजय भोसले, अशोक हरणावळ आणि विजय देशमुख यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पुणे शहरातील विविध विषयांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच राज्यातील इतरही शहरांतील अनेक वर्षे जुन्या भाजी मंडयांचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता असल्याचे आ. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना सूचित केले.  त्याचबरोबर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शहराचा वाढता विकास लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या नियमावलीमध्ये आणखी सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. पुणे शहरात महापालिकेने तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनास भेट देण्याचे निमंत्रण आज मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर मा. मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याविषयी शासनाकडून कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

Web Title: Chief Minister positive for the implementation of the large format of Marathi schools. Dr. Follow-up of Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.