मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 06:04 AM2017-08-15T06:04:21+5:302017-08-15T06:04:24+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान, कोरिया आणि सिंगापूरचा १८ आॅगस्टपासून सुरू होणारा दौरा पुढे ढकलण्यात आला.

Chief Minister postponed the foreign visit | मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा पुढे ढकलला

मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा पुढे ढकलला

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान, कोरिया आणि सिंगापूरचा १८ आॅगस्टपासून सुरू होणारा दौरा पुढे ढकलण्यात आला.
सहा दिवसांच्या या दौºयात मुख्यमंत्र्यांसमवेत सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी जाणार होते. या दौºयात वांद्रे शासकीय कॉलनीचा पुनर्विकास, पुणे विमानतळ, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग आणि बंदर विकासासंदर्भात विविध वित्तीय करारही होणार होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जपान व कोरियातील संबंधित नेते आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांकडे असलेल्या तारखा आणि आमच्या तारखांचा मेळ बसत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिीतीच्या पार्श्वभूमीवर आता दौरा योग्य ठरणार नाही म्हणूनही तो पुढे ढकलल्याचे समजते. कोरिया आणि जपानमध्ये ताणले गेलेले संबंधांमुळेही हा दौरा पुढे ढकलला असण्याची शक्यता आहे. तथापि, या वृत्तास दुजोरा मिळू शकला नाही. हा दौरा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Chief Minister postponed the foreign visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.