Join us

प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 11:35 PM

 मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.  या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. 

मुंबई : मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.  या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, मल्डीमोडल कॉरिडोर, रस्ते आणि उड्डाणपुल, एलव्हेटेड रेल्वे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड इ. प्रकल्पांच्या कामांचा आज प्राधिकरणाच्या बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधांची कामे कालबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना केल्या. सर्वंकष तिकीट प्रणाली व्यवस्था वर्षाखेरीस सुरु करण्याविषयीची सुचना त्यांनी प्राधिकरणाला दिली. त्याचबरोबर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याकरीता हा प्रकल्प वॉर रुमच्या कक्षेत घेऊन कामाचा वेग वाढवावा. कामे पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी. असे त्यांनी सांगितले.

मोनोरेल चा दुसरा टप्पा डिसेंबर अखेर पर्यंत सुरू करावा. बीकेसीमधून हायब्रीड इ बसेस सुरु लवकरात लवकर सूरु करावे आदी सूचनाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. 

प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. अंधेरी [पूर्व] ते दहिसर [पूर्व] मेट्रा मार्ग-7 आणि दहिसर ते डि.एन.नगर मेट्रो मार्ग-2A  ह्या दोन्ही मेट्रो मार्गिका वेळेआधीच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. प्राधिकरणाने इतरही मेट्रो मार्गांचे काम जलद गतीने सुरु करुन मुंबईकरांची वाहतूककोंडतून मुक्तता करावी,  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

कल्याण रिंग रोड, ठाणे ते विठावा स्कायवॉक, कल्याण भिवंडी उड्डाण पूल, कुरार सबवे, कल्याण अंबरनाथ उड्डाणपूल, मानकोली मोतगाव रस्त्यावर उड्डाणपूल आदी कामे वेगाने सुरू असल्याचे तसेच बाह्य रस्ते विकास योजनेतील कामेही प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मेट्रो, मोनोरेल, एम.टी.एच.एल., सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प योजना, मल्टी मोडल कॉरीडोर, हायब्रीड बसेस, वडाळा मास्टर प्लॅन, कॉमन मोबिलीटी कार्ड, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर, कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल, बीकेसी ते वाकोला उन्नत रस्ता, छेडा नगर जंक्शन उड्डाणपूल, कल्याण आणि भिवंडी विकास केंद्र इ. प्रकल्पांच्या कामांचे सादरीकरण केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकल्पाची माहितीही यावेळी देण्यात आली. 

यावेळी अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएमआरडीएचे महानगर सह आयुक्त प्रवीण दराडे, संजय खंदारे,  सह महानगर आयुक्त संजय यादव यांच्यासह प्राधिकरणाचे इतर वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआता बास