मुख्यमंत्र्यांनी व्यंगचित्रकलेकडे लक्ष द्यावे- संजय मिस्त्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:01 AM2020-03-02T01:01:31+5:302020-03-02T01:03:34+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे सुपुत्र आहेत.

Chief Minister should pay attention to cartoonism - Sanjay Mistry | मुख्यमंत्र्यांनी व्यंगचित्रकलेकडे लक्ष द्यावे- संजय मिस्त्री

मुख्यमंत्र्यांनी व्यंगचित्रकलेकडे लक्ष द्यावे- संजय मिस्त्री

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे सुपुत्र आहेत. त्यांनी लहानपणापासून व्यंगचित्रकारांचे जीवन कसे असते हे पाहिले आहे, खरं तर व्यंगचित्रकलेकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. संमेलनाला यायला हवे, मदत करायला हवी. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही भविष्यात संमेलनाला नक्की यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी केले.
श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ, कार्टुनिस्ट कंबाइन आणि कार्टुनिस्ट्स कॅफे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर बोरीवली येथे आखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलन २०२० पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार शांताराम गवाणकर यांनी उपस्थिती दर्शविली होती. अध्यक्षस्थानी कार्टुनिस्ट कंबाइन आणि कार्टुनिस्ट कॅफे क्लबचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री होते. कार्यक्रमात दिवंगत व्यंगचित्रकार विकास सबनीस यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सबनीस यांच्या निकटवर्तीयांनी स्वीकारला.
या वेळी गंगाराम गवाणकर म्हणाले, व्यंगचित्रकार सगळ्यांची सकाळ सुशोभित करतात. कलेला जिवंत ठेवणाºया या संमेलनाला राजकीय मदतीची गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी अभिनेते अरुण नलावडे हेही उपस्थित होते. यावेळी राज्यातील तमाम व्यंगचित्रकारांची उपस्थिती होती.

Web Title: Chief Minister should pay attention to cartoonism - Sanjay Mistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.