मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुंबईच्या सुरक्षेचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 08:28 PM2019-12-14T20:28:22+5:302019-12-14T20:32:21+5:30
मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली
मुंबई - मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली, यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून 'सुरक्षित मुंबई'साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray & State Home Minister Eknath Shinde held a meeting with Police Commissioner, Sanjay Barve & other senior police officials, at the Mumbai Police headquarters, today. pic.twitter.com/GobXccO9K0
— ANI (@ANI) December 14, 2019
कंट्रोल रूमची पाहणी
आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 24 तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.