मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात; मुख्य न्यायाधीशांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:05 AM2021-05-15T04:05:28+5:302021-05-15T04:05:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांची भेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांची भेट घेतली. या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही सदिच्छा भेट होती. दर दोन किंवा तीन महिन्यांनी मुख्यमंत्री ठाकरे मुख्य न्यायाधीशांची भेट घेतात.
मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीशांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी ठाकरे यांच्याबरोबर महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी व मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल होते.
सध्या उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील अनेक समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या सुटीकाळातही मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी काम करत आहेत. या दरम्यान, न्यायाधीशांनी राज्य सरकारला अनेक सूचना केल्या आहेत. ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिवरचा तुटवडा, लसीची कमतरता, यावरून न्यायालयाने राज्य सरकारची अनेकवेळा कानउघडणी केली आहे.
गेले तीन दिवस उच्च न्यायालयातही लसीकरण सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
..............................................े