उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जातोय; फायरब्रॅंड आजींची भावना, सभेलाही उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:14 PM2022-05-14T18:14:43+5:302022-05-14T18:36:07+5:30

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेच्या फायरब्रॅंड चंद्रभागा आजी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Chief Minister Uddhav Thackeray is being deliberately harassed, said Shiv Sena's workers Chandrabhaga Aaji | उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जातोय; फायरब्रॅंड आजींची भावना, सभेलाही उपस्थित राहणार

उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जातोय; फायरब्रॅंड आजींची भावना, सभेलाही उपस्थित राहणार

Next

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असणाऱ्या मातोश्रीसमोर राणा दाम्पत्यासाठी उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या फायर ब्रॅंड आजी देखील आज बीकेसीत होणाऱ्या सभेला उपस्थित असणार आहे. 

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेच्या फायरब्रॅंड चंद्रभागा आजी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जात असल्याची भावना चंद्रभागा आजी यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज सभा, वांद्रे पूर्व येथेल बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. 

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल.  महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल.  पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहे. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी संभाजीनगरात (औरंगाबाद) महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असंही राऊत यांनी सांगितलं.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray is being deliberately harassed, said Shiv Sena's workers Chandrabhaga Aaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.