मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:22 AM2021-03-31T00:22:13+5:302021-03-31T00:25:25+5:30

Rashmi Thackeray News : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray admitted to Reliance Hospital | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. गेले आठ दिवस त्यांना खोकला येत होता. त्यामुळे त्यांना मंगळवारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray admitted to Reliance Hospital)

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातलेले आहे.  कोरोनाचा विषाणू  थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी स्वत:ल घरीच क्वारेंटाइन करून घेतले होते. 

रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोरोनाची लस घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांना कोरोनाचा संर्ग झाला होता. सुरुवातीला वर्षा निवासस्थानी क्वारेंटाइन राहिल्यानंतर आता रश्मी ठाकरे यांना अधिक उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray admitted to Reliance Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.