योजना कर्मचा-यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री घेणार बैठक, पंकजा मुंडेंचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:04 AM2017-08-05T03:04:35+5:302017-08-05T03:04:59+5:30
शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात योजना कर्मचाºयांनी गुरुवारी चक्काजाम केले. त्याची दखल घेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत येत्या आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन योजना कर्मचाºयांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
मुंबई : शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात योजना कर्मचाºयांनी गुरुवारी चक्काजाम केले. त्याची दखल घेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत येत्या आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन योजना कर्मचाºयांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सीटूच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, शालेय व अंगणवाडी पोषण आहार कामगार व आहार पुरवठादार बचतगटांच्या महिला, बाल कामगार प्रकल्प कर्मचारी इत्यादी कामगार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नेत्रदीपा पाटील व इतर आशा वर्कर्सनी आपल्या व्यथा मांडून सरकारचे वाभाडे काढले. हिराबाई घोंगे, सफिया खान, साजेदा बेगम आदी अंगणवाडी संघटनेच्या नेत्यांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर टीका केली. शालेय पोषण आहार संघटनेचे नेते प्रभाकर नागरगोजे, बालकामगार प्रकल्पाचे नेते सिद्धराम उमराणी व सुनंदा खाडे यांनी १६ वर्षांपासून काम केल्यावरही शासनाच्या एका लेखणीच्या फटकाºयामुळे बेरोजगार झालेल्या कर्मचाºयांची व्यथा मांडली.
बराच वेळ गेल्यानंतरही शासनाकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेर सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड आणि अन्य नेत्यांनी महिला कर्मचाºयांना तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन केले. कोणताही निरोप न आल्याने आंदोलनाच्या अध्यक्षा शुभा शमीम यांच्या भाषणानंतर कर्मचाºयांनी रस्त्यावर धाव घेत चक्काजाम केले. अखेर रस्ता अडल्याने वाहतूक कोंडी झाल्यानंतर शासनाला जाग आली व त्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले.