राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री साधणार उद्योगपतींशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:34 AM2020-01-07T04:34:23+5:302020-01-07T04:34:34+5:30

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी संवाद साधणार आहेत.

Chief Minister will interact with industrialists for industrial development of the state | राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री साधणार उद्योगपतींशी संवाद

राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री साधणार उद्योगपतींशी संवाद

Next

मुंबई : राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, आदि गोदरेज, सज्जन जिंदाल, उदय कोटक, दीपक पारेख, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी आदी नामवंत उद्योगपती उपस्थित राहणार आहेत.
या संवादाच्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे राज्याच्या विकासाबाबतची आपली भूमिका उद्योगपतींसमोर मांडतील. राज्याच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी ा आर्थिक क्षेत्राची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भातील माहिती उद्योगपतींकडून जाणून घेतली जाईल. विकासाचा आराखडा बनविताना त्यामध्ये या सूचनांचा योग्य विचार केला जाणार आहे.
>आराखडा बनविणार
देशाचे सकल उत्पादन व परकीय गुंतवणूक यात राज्य कायम अग्रेसर राहावे आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जावे यासाठी सर्व क्षेत्रांच्या सहभागातून आराखडा बनविण्यात येणार आहे.

Web Title: Chief Minister will interact with industrialists for industrial development of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.