मंत्र्यांच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:42 AM2018-09-22T05:42:54+5:302018-09-22T05:43:06+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांच्या चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.

The Chief Minister will review the affairs of the ministers | मंत्र्यांच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

मंत्र्यांच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांच्या चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबरला बैठकही बोलाविली आहे. फडणवीस यांनी १० आॅगस्टला सर्व मंत्र्यांना एक पत्र पाठविले होते. ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत आपल्या विभागाने घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांचे सादरीकरण आपल्यापुढे करायचे आहे, त्याची तयारी करा, असे पत्रात म्हटले होते.
हे पाच प्रमुख निर्णय निवडताना त्यांच्या लाभार्थींची संख्या, त्याचा दृष्य परिणाम, त्यासाठी केलेला खर्च तसेच गेल्या सरकारमधील १५ वर्षांशी त्याची तुलनात्मक आकडेवारी आदींचा सादरीकरणात समावेश करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
प्रत्यक्ष सादरीकरण हे १५ मिनिटांचे असेल तसेच त्यात सहावा मुद्दा अंतभूत नसेल. हे पाचही मुद्दे केवळ प्रशासकीय स्वरुपाचे न राहता ते जनमानसावर परिणाम करणारे असावेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. सादरीकरणाची लेखी प्रत ३१ आॅगस्टपर्यंत आपल्या कार्यालयाला पाठवावी, असे त्यांनी बजावले
होते. त्यानुसार सर्व मंत्र्यांनी ती सादर केली आहे.
>२४ सप्टेंबरला होणार सादरीकरण
२४ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे. त्या वेळी खात्याचे कॅबिनेट व राज्यमंत्री व सचिव उपस्थित राहतील. ज्या मंत्र्याकडे एकच विभाग आहे. त्यांना १५ मिनिटांचा वेळ, दोन विभाग असतील, तर त्यांना ३० मिनिटांचा वेळ तर तीनपेक्षा जास्त विभाग असलेल्या मंत्र्यांना ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. या वेळेतच प्रत्येक ाला आपल्या कामाचा आढावा मांडावा लागणार आहे.

Web Title: The Chief Minister will review the affairs of the ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.