मुंबई - मुसळधार पावसामुळे राज्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पुरामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली. या पुराचा सामना करण्यासाठी अनेकांना मदतीचा ओघ सुरु झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या 2 दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 20 कोटींहून अधिक रक्कम जमल्याचं पाहायला मिळालं.
राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील घटक, व्यावसायिक, त्यांच्या संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत प्रत्यक्ष जमा करणे किंवा पाठविणे सुरू केले आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या काही हजारांपासून, सामूहिकरित्या एकत्र केलेल्या लाखो रुपयांपर्यंतची मदत सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा ओघ सुरु झाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार या निधीत खालील यादीतील लोकांनी आपलं योगदान दिले.
- सैफी फाऊंडेशनकडून एक कोटी रुपये
- सारस्वत बँकेच्या वतीने एक कोटी रुपये
- आकाश इन्स्टिट्यूटच्या वतीने 51 लाख रुपये
- अलॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कडून 50 लाख रुपये
- इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून 25 लाख रुपये
- सदगुरू श्री. साखर कारखाना यांच्या वतीने 22 लाख रुपये
- लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 25 लाख रुपये
- मर्सिडीज बेंझ कंपनीच्या वतीने 25 लाख रुपये आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वतीने तीन लाख 60 हजार रुपये
- खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून 25 लाख 52 हजार 852 रुपये
- भारतीय जनता पार्टी, मुंबई उत्तर पश्चिम विभागाच्या कडून 21 लाख रुपये, बोरीवली मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने 25 लाख रुपये
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सतरा लाख 72 हजार रुपये
- आमदार मनिषा चौधरी यांच्या मतदार संघातील विविध संस्था संघटना आदींकडून 15 लाख, 43 हजार रुपये
- सुगी समुहाचे निशांत देशमुख यांच्याकडून 11 लाख रुपये
- महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून दहा लाख रुपये
- भाजपच्या उत्तर पुर्व विभागाकडून दहा लाख रुपये
- व्हॅल्यूएबल ग्रुपकडून दहा लाख रुपये
- संजय शिंदे यांच्याकडून 11 लाख रुपये
- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून 10 लाख 4 हजार रुपये
- श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे यांच्या वतीने सात लाख 77 हजार रुपये तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत केले यांच्या वतीने 1 लाख 11 हजार रुपये
- मुलुंडच्या प्रेरणा युवक ट्रस्टकडून पाच लाख रुपये
- एस नरेंद्रकुमार आणि कंपनीकडून पाच लाख रुपये
- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून पाच लाख रुपये
- एस. आर. भल्ला आदींकडून पाच लाख रुपये
- मराठवाडा लोकविकास मंचकडून पाच लाख रुपये
- खासदार कपिल पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये
- मुलुंड सेवा संघाकडून एक लाख पंचवीस हजार रुपये
- फ्युएल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये
- याच संस्थेचे मुख्य प्रवर्तक संतोष हुरलीकोप्पी यांच्याकडून अडीच लाख रुपये
- आमदार भारती लव्हेकर यांच्या पुढाकारातून जमा करण्यात आलेले २ लाख ७१ हजार १०० रुपये
- शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये
- सेव्हिलीयर क्लिनिकल सप्लाईज सर्व्हिसेसकडून १ लाख ११ हजार रुपये
- हेतल गाला यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये
- योगेश कटारिया यांच्याकडून १ लाख १ हजार रुपये
- सन्नी सानप यांच्याकडून १ लाख रुपये
- शकुंतला ठक्कर यांच्याकडून १ लाख रुपये,
- बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १ लाख रुपये
- खार दांड्यातील दांडा कोळी समाजाकडून १ लाख रुपये
यासह अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, त्यांच्या संघटना विविध संस्था-संघटना, मान्यवरांकडून निधीसाठी धनादेश स्वरुपात योगदान देण्याचा ओघ सुरुच आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पुरस्काराची ५० हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे.