मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातून परिस्थितीचा आढावा घेतला. भरतीची वेळ आणिं हवामान खात्याने अतिवृष्टीचा दिलेला इशारा लक्षात घेता सर्व यंत्रणा लोकांचा मदतीसाठी सज्ज करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून मुंबई महापालिका आणि पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षाला हॉटलाईनवर संपर्क साधला.मुंबई शहर आणि परिसरात तसेच राज्यात अन्य भागात सुरू असलेल्या पावसाची आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. मुंबईत कुठल्या भागात पाणी तुंबले आहे, झाडे पडली आहेत. कोणी जखमी झाले का, वाहतुकीची तसेच दळणवळणाच्या स्थितीची काय परिस्थिती आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: माहिती घेतली. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तालयातून सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेत अधिका-यांना सूचना दिल्या.मुंबई शहरात आतापर्यंत २५ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारींची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षातून मिळाली. झाडे कोसळण्याच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. मात्र, सुदैवाने अद्याप कुणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी परिस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट केले. जोरदार पावसामुळे दळणवळणाच्या साधनांवर परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल सेवा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तुंबलेले पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल.सेना-भाजपामुळेच मुंबईकरांचे हालअतिवृष्टीमुळे मुंबईकरांना भोगाव्या लागणा-या हालअेपष्टांना शिवसेना आणि भाजपा युती आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. २००५ सालच्या अनुभवानंतरही सत्ताधा-यांनी काहीच सुधारणा केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने ६ पंपिंग स्टेशन्सवर १२०० कोटी खर्च केले. पण या पावसात पंपिंग स्टेशन ठप्प आहेत. केंद्र सरकारने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी १६०० कोटींचा निधी दिला मात्र त्यापैकी फक्त ४० टक्के निधी खर्चण्यात आला.विमानसेवेवर परिणाम १० विमानांचे उड्डाण मंगळवारी खराब वातावरणामुळे रद्द करून ७ विमाने इतरत्र वळवण्यात आली.न्यायालयातच मुक्काम घराकडे रवाना झालेले बहुतेक कर्मचारी रेल्वे सेवा विस्कळीत असल्याने न्यायालयात परतले. सुमारे ३०० कर्मचाºयांना रात्रीचा मुक्काम न्यायालयातच करावा लागला....तरच कार्यालयात या आज अतिवृष्टी सुरू राहिल्यास कर्मचारी आणि अधिकारी यांना (आपत्कालीन सेवेसाठी आवश्यक असणाºया अधिकारी आणि कर्मचारी वगळून) कार्यालयात अनुपस्थित राहण्याची मुभा राहील.
मुख्यमंत्री हॉटलाइनवर!, सीसीटीव्हीद्वारे परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 5:34 AM