मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष २४ तास सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:47 AM2018-01-02T04:47:00+5:302018-01-02T04:49:45+5:30
गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ लाख रुग्णांना संजीवनी देणारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष लवकरच २४ तास सुरु राहणार आहे. राज्याच्या कोणत्याही कोपºयातील रुग्णाला तत्काळ आॅनलाइन मदत त्या माध्यमातून दिली जाणार आहे.
मुंबई - गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ लाख रुग्णांना संजीवनी देणारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष लवकरच २४ तास सुरु राहणार आहे. राज्याच्या कोणत्याही कोपºयातील रुग्णाला तत्काळ आॅनलाइन मदत त्या माध्यमातून दिली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या महत्त्वाच्या योजना सामाजिक जाणिवेतून हाती घेतल्या त्यात या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा समावेश होता. मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतंत्र सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. याचा विस्तार करीत आता २४ तास सेवा दिली जाईल. राज्याच्या कोणत्याही भागात तत्काळ वा अन्य स्वरुपाच्या कोणत्याही उपचारासाठी आॅनलाइन नोंदणी करता येईल. कक्ष, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य सेवक, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा, संबंधित रुग्णालय हे सहाय्यता कक्षाशी जोडलेले असतील. तातडीने उपचारासाठी जवळच्या इस्पितळात सोय केली जाईल. नंतर पूर्ण उपचाराची व्यवस्था करण्यात येईल.
गरीब रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या सहाय्यता कक्षाद्वारे २०१५ मध्ये १७९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१६ मध्ये ही रक्कम २०९ कोटी होती तर २००९ मध्ये जवळपास २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यातून १४ लाख रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. या शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३० हजार रुग्णांना २६० कोटी रुपयांची मदत उपचारासाठी देण्यात आली.
हा सहाय्यता कक्ष केवळ मंत्रालयातील कक्षापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात जवळपास १५ महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्याचा फायदा हजारो रुग्णांना झाला आहे.