मुख्यमंत्र्यांची सामंजस्य करार मोहीम सोमवारपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:45 AM2019-02-09T06:45:19+5:302019-02-09T06:45:37+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोमवारपासून नामवंत कंपन्या, व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने २००हून अधिक सामंजस्य करार होणार आहेत. एकाच वेळी इतके करार होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Chief Minister's reconciliation agreements campaign started on Monday | मुख्यमंत्र्यांची सामंजस्य करार मोहीम सोमवारपासून सुरू

मुख्यमंत्र्यांची सामंजस्य करार मोहीम सोमवारपासून सुरू

Next

- यदु जोशी

मुंबई  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोमवारपासून नामवंत कंपन्या, व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने २००हून अधिक सामंजस्य करार होणार आहेत. एकाच वेळी इतके करार होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

मुख्यमंत्री कार्यालयातील ‘महापरिवर्तन’ टीमने एमओयूंची तयारी केली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, वने, कौशल्य विकास, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठे बदल करण्यासाठी हे करार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सुमारे साठ करार होतील. वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कौशल्यविकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणीपुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या खात्यांशी संबंधीत करार येत्या काही दिवसांत होतील.

देशात सध्या ६० हजार कोटी रुपयांच्या वैद्यकीय उपकरणांची आयात होते. मुंबई आयआयटीच्या पेटिक सेंटरमध्ये भारतीय तंत्रज्ञानाने तुलनेने कमी खर्चात उपकरणांची निर्मिती केली जाते. सरकारी वैद्यकीय रुग्णालये व महाविद्यालयांना लागणारी उपकरणे पेटिक सेंटरमधून बनवून घेण्यात येतील. या उपकरणांचा उपयोग आरोग्य महाशिबिरांमध्येदेखील केला जाईल.

ठळक वैशिष्ट्ये

दीड लाख मुलांना देणार मोफत चष्मे एसीलॉर ही कंपनी देणार.
नाला रुंदीकरण, पाणीसाठ्यांमधील गाळ काढणार भारतीय जैन संघटना.
कॉन्जिनेन्टल हार्टसर्जरी खारघरचे सत्यसाई हॉस्पिटल करणार.

चार मनोरुग्णालयांची दर्जावाढ
गॅस्ट्रोअँट्रॉलॉजिस्ट डॉ.अमित मायदेव एक हजार शस्त्रक्रिया मोफत करणार.
टाटा ट्रस्टतर्फे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये म्युझियम.
विविध एनजीओंच्या मदतीने जिल्हावार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मोहीम.

Web Title: Chief Minister's reconciliation agreements campaign started on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.