मुंबई : झोपड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी डेडलाइन निश्चित करण्याची कळकळीची विनंती पालिका अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी केली. मुंबईतील विकासकामे, प्रकल्प व सुविधांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पालिका मुख्यालयात गुरुवारी तीन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत झोपडपट्टीमुक्त व खड्डेमुक्त मुंबई, पाणीपुरवठा, परवडणारी घरे आणि मुंबईतील पर्यटनाला चालना देणाºया ‘व्हिजन २०३०’चे लक्ष्य त्यांनी निश्चित केले.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयाला गुरुवारी भेट दिली. दुसºया मजल्यावर असलेल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजय मेहता, आयुक्त प्रवीण परदेशी, महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, विजय सिंघल, आबासाहेब जºहाड, प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम खाते आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बुधवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाºया अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावाही त्यांनी घेतला.झोपड्यांवर नियंत्रण हवेमुंबईत झोपड्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम पायाभूत सुविधांवर होत आहे. २०१२ पर्यंतच्या झोपड्यांवर कारवाई होत नाही. या डेडलाइनवर नियंत्रण आणण्याची विनंती अधिकाऱ्यांनी या बैठकीत केली. परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही या वेळी चर्चा झाली.खड्डेमुक्त मुंबईमहापालिकेने गेल्या महिन्यात ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही मोहीम आणली. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच ही योजना आपल्या राज्यात अंमलात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संपर्कात काह़ी राज्ये असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र रस्त्यांची दुरवस्था रोखण्यासाठी १० वर्षांचा हमी कालावधी निश्चित करून तो रस्ता चांगला ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्याची सूचना या वेळी करण्यात आली.मुबलक पाण्यासाठी २०३० चे लक्ष्यमुंबईतील पाण्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने जलस्रोत वाढविणाºया प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये गारगाई, पिंजाळ या प्रकल्पांच्या मार्गातील अडचणी दूर करणे, आवश्यक शासकीय परवानगी मिळवणे याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ होऊन २०३० पर्यंत मुबलक पाणीपुरवठ्याचे लक्ष्य त्यांनी अधिकाºयांपुढे ठेवले आहे.पर्यटनाला चालनामुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी वॅक्स म्युझियम, तीन एकर जागेत आधुनिक मत्स्यालय, नॅशनल पार्कमध्ये नाइट सफारीबाबतही चर्चा करण्यात आली.
मुंबईच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन २०३०’; २४ तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 5:52 AM