Join us

कन्येच्या विवाहावरील खर्च टाळत माजी मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्री मदत निधीला पाच लाखांची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 3:27 PM

राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य  दिनेश कुमार जैन यांनी कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला दिली.

ठळक मुद्देदिनेश कुमार जैन यांनी कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला दिली.नवदाम्पत्य श्रेया आणि सबरीश यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील विधवा महिलांच्या कल्याणासाठी वापरावी असे आवाहन श्रेया जैन यांनी केले.

मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य  दिनेश कुमार जैन यांनी कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला दिली. नवी दिल्ली येथे झालेल्या विवाह समारंभात नवदाम्पत्याला आर्शिवाद देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी नवदाम्पत्य श्रेया आणि सबरीश यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

ही रक्कम शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील विधवा महिलांच्या कल्याणासाठी वापरावी असे आवाहन श्रेया जैन यांनी केले आहे. प्रत्येकाने अशा प्रकारे विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्चात बचत करीत सामाजीक दायित्व म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन दिनेश कुमार जैन यांनी केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशेतकरीलग्न