मुख्य सचिवांनी निर्णय घेताना विश्वासात घ्यावे; विदर्भातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 01:00 AM2020-04-12T01:00:57+5:302020-04-12T01:01:34+5:30

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत समाजकल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करावी, स्थानिक परिस्थितीनुसार

The Chief Secretary should take the decision into consideration; Demand for Ministers of Vidarbha to Chief Ministers | मुख्य सचिवांनी निर्णय घेताना विश्वासात घ्यावे; विदर्भातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्य सचिवांनी निर्णय घेताना विश्वासात घ्यावे; विदर्भातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

अतुल कुलकर्णी ।

मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या टाळबंदीच्या काळात गोरगरिबांना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेताना मुख्य सचिधांनी मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विजय वडेट्टीवार व सुनील केदार यांनी केली आहे. या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मंत्र्यांशी संवाद साधला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब व गरजूंना शिजवलेले अन्न देण्याऐवजी धान्यांची पाकिटे देऊ केले, त्यामुळे लोकांना तातडीने धान्य मिळू लागले मात्र तो निर्णय मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बदलला. राज्यात दूध संकलनाचे काम वेगाने चालू करण्याची वेळ असताना दूग्ध व पशूसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या महानंदचे अधिकारी परस्पर बदलले गेले.
याबाबत राऊत यांनी लोकमतला सांगितले, आम्ही पालकमंत्री म्हणून घेतलेला निर्णय मुख्य सचिव मंत्रालयात बसून कसे काय बदलू शकतात? शिजवलेले अन्न १ लाख लोकांना द्यायचे तर महिन्याला १५ कोटींचा खर्च आहे, शिवाय कडक ऊन असल्याने ते किती काळ टिकले हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही धान्याची पाकिटे देणे सुरू केले, त्याचा महिन्याला खर्च फक्त अडीच कोटी रुपये आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून हा निर्णय बदलला गेला. तर विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, आपण मुख्य सचिवांना सांगितले की, आपल्यावरही कामाचा ताण आहे, म्हणून पालकमंत्र्यांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेताना सुलभता कशी आणता येईल, हे आपण पहावे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत समाजकल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करावी, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असावेत, धान्य साठा ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात गोडावून भाड्याने घ्यावीत. रेशनकार्ड नसलेले आॅफ लाईन देण्याची गरज असलेल्यांना धान्य देण्यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये धान्यासाठी खर्च करण्यास परवानगी द्यावी, यावर निर्णय झाल्याची माहिती राऊत यांनी दिली.

व्हिडीओ कॉन्फरन्स
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत ऊर्जामंत्री राऊत, सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मुंबई गाठली. येताना प्रशासनाची रितसर परवानगीही घेतली. मुंबईत आल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स केली. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यात आपण लक्ष घालतो, असे त्यांना सांगितले.

कºहाडमध्ये कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू
सातारा : कºहाडमध्ये ५४ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ आहे. हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो २१ मार्चला त्याच्या गावी आला. ३० मार्चला त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर ५ एप्रिलला त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल होते. ७ एप्रिलला ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी नव्याने सात अनुमानित रुग्ण दाखल झाले आहेत. निझरे येथील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित ११ ते ५७ वर्षे वयोगटांतील ५ पुरुष व १ महिला तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे ९ महिन्यांचे बाळ अशा ७ अनुमानितांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The Chief Secretary should take the decision into consideration; Demand for Ministers of Vidarbha to Chief Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.