मुंबई - राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील स्वच्छतेची जातीने पाहणी केली होती. यावेळी त्यांनी सर्व विभागांनी पॅसेजमधील सामान तातडीने हटवावे, असे आदेशही दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी विविध विभागांनी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रालयामध्ये आज सकाळी फेरफटका मारला असता नगर विकास विभाग बांधकाम विभाग, माळ्यावरील मंत्री दलनाबाहेरचा पॅसेज, उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव यांच्या दालनाबाहेरील पॅसेज येथे मोठ्या प्रमाणात फायली वह्या कागदी आढळून आले. चौथ्या माळ्यावर शिक्षण विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण सुरू आहे त्या ठिकाणचे सर्व सामान हे बाहेर पॅसेजमध्ये अस्तव्यस्त टाकलेले आहे.