मुंबई : पुणे पाठोपाठ मुंबईतही चिकुनगुनियाचे ४ रुग्ण आढळले आहेत, तर २४ संशयित रुग्ण पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात गेल्या १२ दिवसांत डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळले आहेत.पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. यातील ४ पैकी ३ रुग्ण हे पालिकेच्या ई विभागातील आहे, तर १ रुग्ण डी विभागातील आहे. हे चौघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पुरळ येणे, सांधेदुखी ही चिकनगुनियाची प्रमुख लक्षणे आहेत. डेंग्यूपाठोपाठ चिकुनगुनियानेही डोके वर काढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या १२ दिवसांत डेंग्यूच्या तापाने मुंबईकरही फणफणत आहेत. १२ आॅक्टोंबर डेंग्यूचे १०२ रुग्णांची नोंद पालिकेच्या दफ्तरी आहे, तर या व्यतिरिक्त १८१३ डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेत, वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे. लेप्टो, डेंग्यू, हेपेटायटीस, गॅस्ट्रो पाठोपाठ चिकुनगुनियाचे रुग्ण मुंबईत आढळू लागल्याने, वैद्यकीय क्षेत्रात आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
पुण्यापाठोपाठ मुंबईत चौघांना चिकुनगुनिया
By admin | Published: October 14, 2016 2:28 AM