Join us

जोगेश्वरीत १५ व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 2:43 PM

पंधराव्या मजल्यावरून पडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

जोगेश्वरीत १५ व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू 

गौरी टेंबकर - कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: जोगेश्वरीत राहत्या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून पडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी उशीरा रात्री हा प्रकार घडला असुन याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

अंबोली परिसरात असलेल्या एका उच्चभू इमारतीत पंधराव्या मजल्यावर तो आई वडील आणि स्वयंपाक्यासोबत राहत होता. रात्री दोनच्या सुमारास तो घराच्या बाल्कनीतुन खाली कोसळला. हा अपघात घडला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याने आत्महत्या केल्याची संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र नंतर हा अपघात असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी अंबोली पोलीस अधीक चौकशी करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई