भार्इंदरमध्ये अजूनही राबतात बालमजूर
By Admin | Published: May 25, 2014 01:23 AM2014-05-25T01:23:28+5:302014-05-25T01:23:28+5:30
औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योगांत लहान मुलांनाच बालमजुराचे काम देण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे.
भार्इंदर : कायद्याने लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा ठरत असला तरी या कायद्याची ऐशी-तैशी करून येथील औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योगांत लहान मुलांनाच बालमजुराचे काम देण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनासह बालमजुरांसाठी राबणार्या सामाजिक संस्था व कामगार न्याय निरीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. बालमजुरांना कामाचा कमी मोबदला द्यावा लागत असल्याने अनेक उद्योगांतील मालकांच्या वेतनाची बचत होत असते. त्यामुळेच हलकी कामे त्यांच्याकडून करून घेतल्याचे उद्योगाच्या मालकाकडून सांगण्यात आले. बालमजूर प्रकरणी शासकीय यंत्रणेची धाड जरी पडत असली तरी त्यातील गुन्हेगार मालक यंत्रणेच्या अधिकार्यांशी तडजोड करून मोकळे सुटतात.