लहानग्यांच्या लठ्ठपणावर वेळीच उपचार व्हावेत- गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 12:47 AM2019-01-05T00:47:14+5:302019-01-05T00:47:27+5:30

शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून, यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधनासाठी तसेच ज्या बालरुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे .

 Child obesity should be treated at the same time - Girish Mahajan | लहानग्यांच्या लठ्ठपणावर वेळीच उपचार व्हावेत- गिरीश महाजन

लहानग्यांच्या लठ्ठपणावर वेळीच उपचार व्हावेत- गिरीश महाजन

Next

मुंबई : शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून, यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधनासाठी तसेच ज्या बालरुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना आवश्यकता भासल्यास राज्य सरकारतर्फे सामाजिक दायित्व निधींतर्गत मदत मिळवून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगितले.
‘फाइट ओबेसिटी’ या उपक्रमांतर्गत राज्य सरकार लठ्ठपणाच्या समस्येवर काम करत आहे. या अभियानांतर्गत शुक्रवारी लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले, त्या वेळी महाजन बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेता आमीर खानही उपस्थित होता.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सुमारे २२ टक्के लहान मुले लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धती, बदललेली जीवनशैली आणि काही वेळा परिवारातील जीन्समुळे लठ्ठपणा संभवतो. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मुलं मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शारीरिक व्यायामाच्या अभावी लठ्ठपणा वाढतो आहे. डॉ. बोरुडे यांच्या उपक्रमामुळे देशातीलच नव्हे तर जगातील मुलांच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध झाली आहे, असे महाजन म्हणाले.
या वेळी आमीर खान म्हणाला की, आपल्या देशात एकीकडे लहान मुलांच्या कुपोषणाची समस्या आहे, तर दुसरीकडे चुकीच्या आहार पद्धतीमुळे लहानग्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या आहे. लहान मुलांवर उपचार करणे अवघड आहे, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया करून वजन कमी करणे हा शेवटचा उपाय ठरतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: पाच महिन्यांत फॅट लॉस केला असल्याचे खान यांनी या वेळी सांगितले.

वैद्यकीय विभागातर्फे विशेष ‘टीम’
लठ्ठपणाच्या समस्येला समूळ नष्ट करायचे असल्यास लहान मुलांच्या लठ्ठपणावर काम करणे आवश्यक असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. लहान मुलांच्या लठ्ठपणावर काम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाइट व इतर उपक्रमांतर्गत जनजागृती तसेच तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे चाइल्ड ओबेसिटी सपोर्ट टीम तयार करण्यात आली आहे.

शर्मिला ठाकरेंचीच चर्चा
लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. बोरूडे हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे व्याही आहेत. त्यामुळे कार्यक्रम जरी भाजपा मंत्र्यांच्या उपस्थितीत होत असला तरी राज यांच्या पत्नी शर्मिला या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून आवर्जून उपस्थित होत्या आणि त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनला.

Web Title:  Child obesity should be treated at the same time - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.