‘दिशा’च्या धर्तीवरील कायद्यात ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चाही समावेश; गृहमंत्री देशमुख यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:53 AM2020-03-12T01:53:34+5:302020-03-12T01:54:14+5:30

एनसीआरबीने महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे (टीपलाइन) तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केली. यात मुंबईतील सुमारे ६०० प्रकरणांचा समावेश असल्याचे समोर आले.

Child pornography is also included in the law on 'direction'; Home Minister Deshmukh's announcement | ‘दिशा’च्या धर्तीवरील कायद्यात ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चाही समावेश; गृहमंत्री देशमुख यांची घोषणा

‘दिशा’च्या धर्तीवरील कायद्यात ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चाही समावेश; गृहमंत्री देशमुख यांची घोषणा

Next

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिला अत्याचार रोखण्यासाठी कायदा होणार असला तरी त्यात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या तसेच अश्लील क्लिप्स (चाइल्ड पोर्नोग्राफी) सोशल मीडियावर प्रसारित करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचाही समावेश करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याच्या उत्तरात देशमुख यांनी सांगितले की, चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधील ठोस कारवाईसाठी आॅपरेशन ब्लॅक फेस ही मोहीम चालविण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत ४० जणांना अटकदेखील करण्यात आली आहे.

देशभरात अशा स्वरूपाच्या करवाईमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’कडून (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी-युएसए) ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था समाजमाध्यमांवरील अश्लील व बाललैंगिक अत्याचाराच्या चित्रफिती आदींची (पोर्नोग्राफिक व्हिडीओ) माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम आदी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर (ईएसपी) यांच्या सहकार्याने एनसीआरबीला पुरविते. एनसीआरबीकडून ही माहिती संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना कारवाईकरिता पुरविण्यात येते. चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात राज्यात आतापर्यंत १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबईत एकाला अटक
महाराष्ट्रात बालकांवरील लैंगिक अत्याचारांबाबत तब्बल १७०० ध्वनिचित्रफिती (चाइल्ड पॉर्नोग्राफी) आढळून आल्याने ‘आॅपरेशन ब्लॅकफेस’अंतर्गत राज्यभरात गुन्हे नोंदविण्यास सुरुवात झाली. यात, मुंबईत ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.

अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर आॅफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था चाइल्ड पॉर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. फेसबुकसह अन्य समाजमाध्यमे, संकेतस्थळांवर जाहीर होणाºया चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन’(एफबीआय) या सर्वोच्च तपास यंत्रणेला माहिती पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा अन्य मजकूर समाजमाध्यमांवर जाहीर करणाºया व्यक्तींची तांत्रिक माहिती पुरवण्याबाबत ही संस्था आणि केंद्र्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत(एनसीआरबी) करार केला आहे. या करारानुसार या संस्थेने चाइल्ड पॉर्नोग्राफी पसरविणारे आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती एनसीआरबीला दिली.

एनसीआरबीने महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे (टीपलाइन) तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केली. यात मुंबईतील सुमारे ६०० प्रकरणांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यातूनच देशव्यापी आॅपरेशन ब्लॅकफेस मोहीम सुरू झाली. सायबर महाराष्ट्रने तज्ज्ञांच्या मदतीने चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित चित्रफिती, मजकूर, छायाचित्रे जाहीर (अपलोड) करणाºया व्यक्तींची ओळख पटवली. त्या व्यक्तीनेच हे कृत्य केले हे स्पष्ट करणारे पुरावेही गोळा केले. त्या जिल्ह्यांतील प्रकरणे तेथील पोलिसांकडे कारवाईसाठी सुपूर्द केली. त्याआधारे राज्यात सर्वत्र गुन्हे नोंदविण्यास सुरुवात झाली.

यात, मुंबईत सायबर पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करण्यात आले. याच गुन्ह्यांमध्ये साहिब शक्ती मोदक (२२) याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोदकने त्याच्या गुगल फोटोजमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ, फोटो, अपलोड केले होते. परराज्यातला मोदक दादर भागात जरीकाम करणाºया कंपनीत नोकरीला होता. त्याच परिसरात तो भाड्याच्या घरात राहत होता. त्याने हे व्हिडीओ कुठून व कसे मिळवले? त्याने हे कृत्य का केले? याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

Web Title: Child pornography is also included in the law on 'direction'; Home Minister Deshmukh's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.